शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:25 IST

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांतील भाजप सरकारच्या कारभाराचा पोलखोल करीत राष्टÑवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करीत प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना ‘आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्काराचे उपमहापौर महेश सावंत यांच्या हस्ते व राष्टÑवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आदींसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ...

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांतील भाजप सरकारच्या कारभाराचा पोलखोल करीत राष्टÑवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी उपहासात्मक पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करीत प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना ‘आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्काराचे उपमहापौर महेश सावंत यांच्या हस्ते व राष्टÑवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आदींसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.दुपारी बाराच्या सुमारास प्रतीकात्मक मुख्यमंत्री रामेश्वर पतकी यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला. गाडीतून उतरताना कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. आंदोलनस्थळी व्यासपीठावर आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, उपमहापौर महेश सावंत, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, भैया माने, युवराज पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.नेत्यांची भाषणे सुरू असताना प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना भेटून विविध प्रश्नांची निवेदने लोकांकडून दिली जात होती. त्यावर प्रतीकात्मक मुख्यमंत्री स्मितहास्य करून निवेदनावर सही करून ते पाठीमागे उभ्या असलेल्या पी.ए.कडे देत होते. मुख्यमंत्र्यांना नुकताच अमेरिकेत ‘आऊटस्टॅँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार दिला. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या चार वर्षांत त्यांनी मराठा, लिंगायत, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण कायम केले. पेट्रोल, डिझेल दरवाढ करून नागरिकांना दिलासा दिला, आदी महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांना ‘आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर’ हा उपहासात्मक पुरस्कार दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.एवाय आणि मुख्यमंत्री‘दादां’समवेत ज्यांनी अनेक वेळा माझी भेट घेतली, ते ए. वाय. पाटील... असे प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांमधून टाळ्या आणि हास्याचे फवारे उडाले. ए. वाय. पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी तो टोमणा होता.पालकमंत्र्यांचे अभिनंदनभाजप व शिवसेना एकत्र न आल्यास कॉँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. ते अध्यात्मवादी असून, त्यांना भविष्य कळून दृष्टांत झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असून, याबद्दल त्यांना साखर भरवू, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला....तर राष्टÑवादीची माफीविकासाची, दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याबाबत अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना उपहासात्मक पुरस्कार देऊन केलेल्या आंदोलनातील एकही मुद्दा चुकीचा असल्यास राष्टÑवादी माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हान आमदार मुश्रीफ यांनी दिले.